– अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती
गडविश्व
अमिर्झा, १० जुलै : जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मरेगाव गावालगत असलेल्या विहिरीत इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना आज रविवार १० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
जीवन मसराम अंदाजे वय (४०) रा. मरेगाव असे मृतकाचे नाव आहे.
मरेगाव टोली ते मरेगाव मार्गावर गावालगत असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. मात्र मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. सदर मृतक हा काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे एवढ्या दिवसांनी मृतदेह आढळल्याने सदर इसमाची हत्या की आत्महत्या हे कळू शकले नाही. पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहे.
