गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

1568

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या पोर्ला वन परिक्षेत्र क्र. ६ मध्ये सरपणासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किशोर तुळशीदास मामेडवार (३०) रा.पोर्ला असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार किशोर मामेडवार हे आज सकाळच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ६ मधील जंगल परिसरात सरपणासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात किशोर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले मौका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here