गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

1221

The गडविश्व
गडचिरोली : जंगलात सरपण गोळा करण्याकरिता गेलेल्या इसमावार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज 16 जून रोजी आरमोरी तालुक्यातील इंजेवारी वनक्षेत्रात घडली. वासुदेव मुरलीधर मेश्राम 36 रा. इंजेवारी असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक हे सकाळच्या सुमारास गावालगत असलेल्या जंगल परिसरात सरपण गोळा करण्याकरितो गेले. दरम्यान वाघाने मेश्राम यांच्यावर हल्ला करून ठार केले. सदर घटनेमुळे परिसराम भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहीती होताच वनकर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मौका पंचनामा करून प्रेत ताब्यात घेवून शवविच्देदनाकरिता पाठविण्यात आले. अधीक तपास वनविभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here