रानटी हत्तींचे गडचिरोली व वडसा वनविभागात हैदोस

1148

– शेतपिकांची नासधुस, नागरिक भयभित
The गडविश्व
गडचिरोली, ४ नोव्हेंबर : जिल्हयात मागील अनेक महिन्यांपासून रानटी हत्तींच्या कळपाने प्रवेश केला. दरम्यान गोंदिया जिल्हयात रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता मात्र आता पुन्हा हत्तींच्या कळपाने आपला मोर्चा वळवत गडचिरोली जिल्हयातील वडसा व गडचिरोली वनविभागात पलायन करत हैदोस माजविल्याने शेतपिकांची नासधुस होत असून नागरिकांमध्ये अद्यापही दहशत कायम असून भयभित झाले आहे.
वडसा तसेच गडचिरोली वनविभागत रानटी हत्ती येण-जाण करीत असल्याचे दिसून येत असून यामुळे अनेक शेतपिकांना याचा फटका बसत आहे. नागरिकांच्या घरांना क्षतीग्रस्त करणे असा सुध्दा प्रकार सुरू असल्याने नागरिक भयभित झाले असून या सर्व प्रकारावर वनविभाग पाळत ठेवत आहे. हत्तींच्या कळपाचे वडसा व गडचिरोली वनविभागात येण-जाण सुरू असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यादरम्यान शेतकऱ्यांचेही मोठय प्रमाणात नुकसान होत आहे तर परिसारत दहशत कायम आहे. हत्तींचा कळप गावात प्रवेश करू नये याकरिता वनकर्मचारी यांच्यासह गावातील नागरिकही पहारा देत असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here