गडचिरोली-भामरागड : अखेर कु.मीना सिडाम हत्याकांडातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

5206

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील मन्नेराजाराम गेर्राटोला येथील शेतशिवारातील नाल्यात कु.मिना येर्रा सिडाम (१७) हिची हत्या करून जमिनीत पुरून ठेवल्याची घटना ६ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या अवळण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. अविनाश रंगा मडावी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील मौजा मन्नेराजाराम येथील गावकऱ्यांनी मन्नेराजाराम गेर्राटोला येथील शेतशिवारातील नाल्यात प्रेत पुरुन ठेवले असल्याची माहीती ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी उपपोलीस स्टेशन दामरंचा येथे फोनद्वारे कळविले. त्यावरुन उप पोलीस ठाणे दामरंचा येथील पोलीस पथक घटनास्थळावर रवाना होवून भामरागडचे कार्यकारी दंडाधिकारी अनमोल कांबळे यांचे समक्ष सदरचे प्रेत उकरुन काढले. उप पोलीस ठाणे दामरंचा येथे मन्नेराजाराम (गेर्राटोला) येथील मिना येर्रा सिडाम ही बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल होती. सदरचे प्रेत हे कु. मिना येर्रा सिडाम हीचे असल्याचे तिचे वडील येर्रा सिडाम यांनी ओळखले. त्यावरून उप पोलीस ठाणे दामरंचा येथे अप.क्र.०३/२०२२ कलम ३०२, २०१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी अविनाश रंगा मडावी हा प्रेत पुरल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच फरार झाला होता.
त्यावरून संशयीत आरोपीचा शोध घेत असतांना आज ०८ एप्रिल २०२२ रोजी उप पोलीस ठाणे दामरंचा येथील प्रभारी अधिकारी सचिन घोडके यांचे गोपनिय बातमीदाराकडून सदरचा संशयीत आरोपी हा करीमनगर (तेलंगाणा राज्य) येथील अशोक नगर येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. व उपविभागीय पोलीस अधिकारीच जिमलगट्टा सुजित कुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोउपनि सचिन घोडके पोउपनि राजेंद्र कपले. पोअं/ प्रशांत गरफडे, पोअं/ सुजित कुमार शिखरे, पोअं श्रीहरी बड़े, असे पोलीस पथक करीमनगर येथे रवाना होवून सदरचे संशयीत आरोपी अविनाश रंगा मडावी यास ताब्यात घेवून सदर घटनेबाबत विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यावरून आरोपी अविनाश रंगा मडावी यास सदर गुन्ह्यात अटक करून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राजेंद्र कपले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here