गडचिरोली : बलात्कार प्रकरणी आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

1269

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, ७ सप्टेंबर : घरात एकटी असल्याचा फायदा घेत जबरजास्तीने बलात्कार करणाऱ्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उदय बा. शुक्ल यांनी १० वर्ष सश्रम कारावास व ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रामदयाल व्यंकट पचोरे (३६) रा. कुदूर्शीटोला ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, २३ जुलै २०१८ रोजी पिडीता ही घरी एकटीच असतांना आरोपी ने तिच्यावर जबरजस्ती करीत बलात्कार केला. याप्रकरणी पिडीतेने पोलीस मदत केंद्र घोट येथे तक्रार दाखल केली असता पोलीस स्टेशन चामोर्शी येथे कलम ३७६(१) भादवी कलामान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीसांनी आरोपीला २३ जुलै २०१८ रोजी अटक केली व पुढील तपास केला असता अरोपीविरूध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. तक्रारदार पिडीता व वैद्यकीय पुरावा, इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आज सप्टेंबर २०२२ रोजी आरोपी रामदयाल व्यंकट पचोरे (३६) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली यांनी कलम ३७६ (१) भादवी कायदयान्वये दोषी ठरवून १० वर्ष सश्रम कारावास व ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. द्रव्यदंडापैकी २५ हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून पिडीतेला देण्याचे आदेश देण्यात आले.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हयाचा तपास मसपोनि अंजली मेवासींग राजपुत पोमके घोट यांनी केला आहे. कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमिका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here