गडचिरोली पोलीस शिपाई भरती – २०२२ : लेखी परीक्षेच्या तात्पुरत्या गुणसुची यादीतील आक्षेप नोंदविण्यास मुदतवाढ

679

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ च्या १३६ जागांसाठी दिनांक १९ जून २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत उमेदवारांकडून लेखी परीक्षेच्या तात्पुरत्या गुणसुची यादीकरीता ३६ तासांच्या आत आक्षेप नोंदविण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात रहिवासी असलेल्या उमेदवारांपर्यंत आक्षेप नोंदविण्यासंदर्भात माहिती सदर मुदतीमध्ये पोहचु न शकल्याने दुर्गम- अतिदुर्गम भागातील उमेदवारांना त्यांचे आक्षेप नोंदविता यावे, म्हणुन गडचिरोली पोलीस दलाकडून गडचिरोली पोलीस शिपाई भरती – २०२२ च्या लेखी परीक्षेच्या तात्पुरत्या गुणसुची यादी संदर्भात आक्षेप नोंदविण्यासाठी ४८ तासांची मुदतवाढ करण्यात आली आहे.
तरी गडचिरोली पोलीस शिपाई भरती २०२२ च्या तात्पुरत्या गुणसुची यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी ४८ तासांच्या आत समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली यांच्या मो. क्र. ८८०६३१२१०० या क्रमांकावर किंवा आपल्या जवळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय / पोस्टे/उपपोस्टे/पोमके/पोलीस मुख्यालय या ठिकाणी लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवावे, असे गडचिरोली पोलीस दलाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here