गडचिरोली पोलीस भरती २०२२ : लेखी परीक्षेची तात्पुरती गुणसूची जाहीर

1220

– आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन

The गडविश्व
गडचिरोली :  गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने १३६ पदांकरीत पोलीस भरती आयोजित करण्यात आली होती. या करीता १९ जून रोजी लेखी परीक्षा पार पडली असून त्या लेखी परीक्षेची तात्पुरती गुणसूची जाहीर करण्यात आली आहे. सादर तात्पुरत्या यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास ३६ तासाच्या आता उमेदवारांनी आपले आक्षेप समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या मो. क्र. ८८०६३१२१०० या क्रमांकावर किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय / पोस्टे/उपपोस्टे/पोमके / पोलीस मुख्यालय या ठिकाणी लिखित नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गचिरोली पोलीस दलाच्या वतीने १३६ पदांकरीत पोलीस भरती आयोजित करण्यात आली होती. सदर भरतीकरिता रविवार १९ जून रोजी लेखी परीक्षा शांततेत पार पडली. पोलीस दलाच्या वतीने लेखी परीक्षेची १९ जून रोजी रात्रो उशिरा उत्तरतालीका जाहीर करण्यात आली होती. सोबतच उत्तरतालीका संदर्भात  काही सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या व उत्तरतालिका प्रसारीत झाल्यानंतर ३६ तासांच्या आत उत्तरतालिकेत दिलेल्या उत्तरासंबंधात उमेदवारांना काही आक्षेप असल्यास आपल्या लेखी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. व मंगळवारी अंतिम उत्तरतालीका जाहीर करण्यात आली होती. आता आज बुधवार २२ जून रोजी लेखी परीक्षेची तात्पुरती गुणसूची जाहीर करण्यात आली आहे.

लेखी परीक्षेची तात्पुरती गुणसूची डाउनलोड करा 

Gadchiroli police recruitment 2022_provisional marks list

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here