गडचिरोली पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहिर होणार

694

– पोलीस भरतीबाबत उमेदवारांना मार्गदर्शक सुचना जारी
The गडविश्व
गडचिरेाली : गडचिरोली पोलीस दलात रिक्त असलेले १३६ पदे भरण्याकरिता पोलीस शिपाई पदाची भरती आयोजीत करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिया २१ मे पासून ते ५ जून पर्यत आयोजीत करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेचे आवेदन अर्ज गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभाग, पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस उपमुख्यालयाय प्राणहिता येथून स्विकारण्यात आले.
सदर १३६ पदांकरिता जिल्हयातील अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केल असून काल अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख होती. आता आवेदन स्विकारण्यात येणार नसून उमेदवारांनी ज्या ठिकाणी आवेदन अर्ज जमा केले आहेत त्याच ठिकाणी व ई-मेल आयडीवर हॉलतिकीट मिळतील, त्याचप्रमाणे लेखी परीक्षेची तारीख व हॉल टिकीट मिळण्याची तारीख लवकरच जाहिर करण्यात येईल असे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here