गडचिरोली पोलीस दलास मिळाले ०३ शौर्य चक्र, ४१ पोलीस शौर्य पदक व ०२ गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक

1365

The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑगस्ट : पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील ०३ अधिकारी / अंमलदारांना शौर्य चक्र, ४१ अधि. / अंमलदारांना पोलीस शौर्य पदक व ०२ पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
शौर्य चक्र प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, भापोसे, नापोशि रविंद्र नैताम, नापोशि टिकाराम काटेंगे हे असून, पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोलीस अधीक्षक, औरंगाबाद मनिष कलवानिया भापोसे., अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली समीर शेख भापोसे, डिवायएसपी भाऊसाहेब ढोले, पोनि संदिप भांड, पोनि संदिप मंडलिक (1″ BAR TO PMG), सपोनि महारूद्र परजने, सपोनि मोतिराम मडावी (1,2 BAR TO PMG), सपोनि योगिराज जाधव, पोउपनि राजरत्न खैरनार, पोउपनि दयानंद महाडेश्वर , पोउपनि हर्षल जाधव, शहीद पोउपनि धनाजी होनमाने (मरणोत्तर), पोहवा / स्व. जगदेव मडावी (मरणोत्तर), पोहवा / सेवकराम मडावी, नापोशि/ राजु कांदो, नापोशि/ दामोधर चितुरी, नापोशि/ राजकुमार भलावी, नापोशि/ सागर मुल्लेवार, नापोशि/ शंकर मडावी, नापोशि/ रमेश आसम , नापोशि/ जिवन उसेंडी, नापोशि/ राजेंद्र मडावी, नापोशि/ मनोज गज्जमवार, नापोशि/ सुभाष वाढई, नापोशि/ दसरू कुरसामी, पोशि/ अविनाश कुमरे, पोशि/ गोंगलु तिम्मा, पोशि/ महेश सयाम, पोशि/ साईकृपा मिरकुटे , पोशि/ रत्नय्या गोरगुंडा , पोशि/ विलास पदा, पोशि/ मनोज इस्कापे , पोशि/ अशोक मज्जी, पोशि/ देवेंद्र पाकमोडे, पोशि/ रोहित गोंगले , पोशि/ दिपक विडपी, पोशि/ सुरज गंजिवार, शहीद पोशि/ किशोर आत्राम (मरणोत्तर), पोशि/ योगेश्वर सडमेक, पोशि/ अंकुश खंडाळे, पोशि/ गजानन आत्राम या जवानांना पोलीस शौर्यपदक मिळाले असून, सहा. फौ / प्रविण बेझलवार, सहा. फौ / प्रमोद ढोरे यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.

शौर्य चक्र, पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना पोलीस शौर्यपदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे  पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असुन त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here