गडचिरोली पोलीस दलात १३६ पोलीस शिपाई पदांची भरती

3363

जाहिरात क्रमांक :- पोअग/प्रलि/पो. भ. २०१९/२०२२

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा व शासन निर्णयाचे अनुषंगाने पोलीस अधिक्षक, गडचिरोली आस्थापनेवरील दिनांक ३१/१२/२०२० रोजी रिक्त असलेली १३६ पदे भरण्याकरीता, पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.
पोलीस भरती करीता प्रमाणीत बिंदुनामावलीनुसार पदे उपलब्ध आहेत. त्याकरीता केवळ गडचिरोली जिल्हयातील रहिवासी आवेदन अर्ज करु शकतात. तसेच हे उमेदवार नियुक्ती झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली साठी पात्र असणार नाहीत.

आवेदन अर्ज उपलब्ध होण्याचे व स्विकारण्याचे ठिकाण :

गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे अर्ज मिळतील तसेच पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे संकेतस्थळावरुन (www.gadchirolipolice.gov.inwww.mahapolice.gov.in) आवेदन अर्ज डाउनलोड करता येईल. आवेदन अर्ज दिनांक २१/०५/२०२२ पासुन उपलब्ध होतील. तसेच दिनांक ०५/०६/२०२२ चे १८.०० वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे आवश्यक फी भरुन स्विकारण्यात येतील.

अधिक माहितीकरिता जाहिरात बघा – 

पोलीस भरती जाहिरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here