गडचिरोली पोलीस दलात होणार ४१६ पदांची भरती

1155

– थेट पोलीस विभागामार्फत राबविण्यात येणार पोलीस भरती

The गडविश्व
गडचिराेली : पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या अस्थापनेवरील ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत गडचिराेली पाेलीस दलात रिक्त असलेल्या ३११ पदे ( १५० पाेलीस शिपाई व १६१ पाेलीस शिपाई चालक ) आणि समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ देसाईगंज, गडचिरोली येथील १०५ पदे अशी एकूण ४१६ पदे १०० टक्के भरण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे.
तथापि गडचिराेली जिल्ह्यातील पाेलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली विहित करण्यात आली नसल्याने भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती. सदर बिंदू नामावली सामान्य प्रशासन विभागाने तयार केली आहे. त्यामुळे आता पाेलिसांची भरती घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे व भरती प्रक्रिया तातडीने राबविली जाणार आहे.
मागील तीन वर्षांपासून पाेलीस भरती झाली नसल्याने जिल्ह्यातील अनेक युवक युवती पाेलीस भरतीच्या प्रतीक्षेत होते. भरती हाेत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली हाेती. मात्र आता नवीन शासन निर्णयामुळे युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तर पाेलीस भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी शासनाने टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएल यांच्याकडे साेपविली हाेती. मात्र आता गडचिराेली जिल्ह्यातील पाेलीस भरती यातून वगळण्यात आली असून जिल्ह्यातील पाेलीस भरती थेट पाेलीस विभाग घेणार आहे. तसेच आजपर्यंतच्या सर्वच पाेलीस भरती पाेलीस विभागानेच घेतल्या आहेत.

याबाबतचा शासन निर्णय बघण्याकरिता Police Bharti क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here