गडचिरोली पोलीस दलातील ०७ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर

398

– एका पोलीस अंमलदार यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

The गडविश्व
गडचिरोली : पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील ०७ अधि./अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व ०१ पोलीस अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार

१) पोउपनि भरत चिंतामण नागरे
२) सहा. फौ/ २१९१ गोपाल मनिराम उसेंडी
३) पोहवा/२७२३ निलेश्वर देवाजी पदा
४) पोहवा/३१०८ संतोष विजय पोटावी
५) नापोशि/२७४४ दिवाकर केसरी नरोटे
६) नापोशि/३००६ महेंद्र गणू कुलेटी
७) पोशि/५३९५ संजय गणपती बाकमवार
तसेच सहा.फी./१२१२ बस्तर लक्ष्मण मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहेत.
राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असुन त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here