गडचिरोली : पुन्हा वाघाचा हल्ला, गुराखी ठार

301

– सततच्या घटनेने नागरिक भयभीत 
The गडविश्व
दिभना (Gadchiroli), २२ सप्टेंबर : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या जेप्रा येथील गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार झाल्याची घटना आज २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नामदेव गेडाम (अंदाजे वय ६०) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, नेहमीप्रमाणे गुराखी नामदेव गेडाम हे गुरे चारण्यास गेले होते. यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभाग व गडचिरोली पोलीसांना दिली. सततच्या घटनेने नागरिक भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करा अशी नागरिकांची मागणी आवासून उभी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here