गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ व ७ मधील आरक्षणाबाबत आक्षेप दाखल

217

– चौकशी करून फेर आरक्षण जाहीर करण्याची विदर्भ महामंच विकास आघाडी संघटना संयोजक गुरुदेव भोपये यांची मागणी
– निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने विभागीय आयुक्त यांना आक्षेप पत्र

The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीकरिता १३ जून रोजी नगर परिषदेच्या सभागृहात आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीवर १५ ते २१ जून पर्यंत आक्षेप नोंदविता येतील असे राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले होते. त्या नुसार विदर्भ महामंच विकास आघाडी संघटना संयोजक गुरुदेव भोपये यांनी गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ व ७ मधील आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदविला असून. आक्षेपाबाबत चौकशी करून फेर आरक्षण जाहीर करण्यात यावे अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने विभागीय आयुक्त यांना आक्षेप पत्रातून केली आहे.
आक्षेप पात्रता म्हटले आहे की, महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक १९६५ च्या कलम नुसार आरक्षण सोडत काढणे गरजेचे आहे. परंतु कायद्यातील व राज्यघटनेतील तरतुदी नुसार आरक्षण काढण्यात आले नसल्यामुळे १३/६/२०२२ रोजी घोषीत करण्यात आलेले आरक्षण चुकीचे व नियमबाह्य आहेत. या करीता आक्षेप घेत आहे. सन २०१६-२०१७ मध्ये प्रभाग क्र. २ लांझेडा मध्ये आरक्षणवर नागरीक मागास प्रवर्ग व सर्व साधारण (महीला) सोडण्यात आले होते. परंतु सन २०२२ मध्ये आरक्षण नियमबाह्य सोडण्यात आले. राज्य घटनेनुसार लोकसंख्या जाती प्रमाणे आरक्षण सोडण्यात येते. परंतु आरक्षण नियबाह्य झाले आहे कारण जात लोकसंख्यानुसार व मतदान संख्या यात फरक आहे. ज्या जात लोकसंख्येची जास्त मतदान असते त्याला प्रभाग आरक्षण मिळतो. लांझेडा प्रभाग मध्ये एकूण मतदान अनुजाती ४७१, अनु. जमाती ४४५ बेरीज केली असता एकूण ९१६ येते.
व ओ. बि. सी. व इतर समाज जातीप्रमाणे लोकसंख्या ३१५४ आहे. तसेच प्रभाग क्र. ७ गणेश नगर येथील एकूण मतदान ४४०७ असुन अनुसूचित जाती ११२१, अनु. जमाती ६८९ एकूण १८१० आणि ओपन २५६९ असुन या प्रभागामध्ये सन २०१६-२०१७ मध्ये अनु. जमाती व अनु. जाती आरक्षण निघाले होते.
या करीता प्रभाग मधील लोकांची व जनतेची दिशाभुल असुन या करीता चौकशी करुन फेर आरक्षण जाहीर करून न्याय दयावे अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर आक्षेप पत्र निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी विदर्भ महामंच विकास आघाडी संघटना संयोजक गुरुदेव भोपये आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here