गडचिरोली : दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या राजूरकरचा मृतदेह अखेर कठाणी नदीपात्रात आढळला

1076

– कठाणी नदी पात्रात घेतली होती उडी

The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : शहरातील मनोज राजूरकर या इसमाने ११ ऑगस्ट रोजी कठाणी नदी पात्रात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली होती. सदर घटनेची माहिती शहरात पसरताच एकच खळबळ उडाली होती. अखेर आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सदर इसमाचा मृतदेह कठाणी नदी पात्राच्या काठावरील झुडपात आढळल्याची माहिती गडचिरोली पोलीसांकडून प्राप्त झाली आहे.
मनोज राजूरकर हे कंत्राटदार होते अशी माहिती आहे. त्यांनी ११ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कठाणी नदी पुलावरून नदी पात्रात उडी घेतल्याची माहिती शहरात पसरली. याची माहिती गडचिरोली पोलीसांना मिळताच तात्काळ पोलीसांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली मात्र नदी पात्रात वाढत असलेल्या पाण्यामुळे मनोज राजुरकर यांचा थांगपत्ता लागला नाही. दोन दिवस नदीला पुर असल्याने शोध घेणे कठीण होते आज १३ ऑगस्ट रोजी अखेर कठाणी नदी पात्रातील पुर ओरल्याने पोलीसांच्या वतीने आज पुन्हा शोधमोहीत राबविली असता राजुरकर यांचा मृतदेह सकाळी ९ वाजताच्या सुमारास नदी काठावरील झुडपात आढळून आल्याची माहिती गडचिरोली पोलीसांनी ‘The गडविश्व’ शी बोलतांना दिली. पोलीसांनी पंचनमा करून मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदन करून कुटुंबास सुपुर्द केले.
सदर घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here