गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार : अनेक मार्ग झाले बंद

1371

– अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती

The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : जिल्ह्यात पावसाने काही दिवस उसंत घेतली असतांना काल पुन्हा पावसाने हजेरी लावत जोरदार बॅटींग केली. मुसळधार पावसाने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मार्ग बंद झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्हयाशी संपर्क तुटलेला आहे.
गडचिरोली जिल्हयात काल ६५.६ मीमी येवढी पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्हयाच्या दक्षिणेस पुन्हा पावसाचा कहर पाहावयास मिळाला आहे. दक्षिणेतील मुलचेरा परिसरात सर्वाधिक १५६.४ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर बामणी १४०.८ मीमी, घोट १२२.० मीमी, एटापल्ली ११८.४ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हयातील इतरत्रही पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयात १ जून पासून आतापर्यंत ११३१.९ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तालुका नुसार पावसाची नोंद मीमी मध्ये

गडचिरोली-१००.४, कुरखेडा-२०.३, आरमोरी-४२.७, चामोर्शी – ८६.८, सिरोंचा ३६.६, अहेरी ५१.४, एटापल्ली १११.१, धानोरा ६१.४, कोरची २५.३, देसाईगंज ४२.६, मुलचेरा १५६.४, भामरागड ५२.०

परिसरानुसार पावसाची नोंद मीमी मध्ये

मुलचेरा सर्वाधिक १५६.४, गडचिरोली १०९.४, येवली ९४.४, पिसेवडधा ७६.२, चामोर्शी ७०.०, कुनघाडा १०५.०, आष्टी ८२.०, असरअल्ली ६८.८, जारावंडी ११३.६, कसनसूर १०५.०, गट्टा १०७.४, चातगाव ७५.४, पेंढरी ७०.६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here