The गडविश्व
गडचिरोली : शासन व जिल्हा प्रशासनाचे आदेशान्वये, राज्यात व जिल्ह्यात कोविड-19 ओमायक्रॉन विषाणूचे झपाट्याने संक्रमण होत असल्याने सदर साथरोगसंदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनानंतर्गत नियमावली व उपाययोजना लागू करण्यात आले आहे.
31.01.2022 चे शासन आदेशामध्ये लसीकरणाच्या मापदंडानुसार जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात आले असून ज्या जिल्ह्यांमध्ये 30 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोसचे 90% पेक्षा जास्त लसीकरण तसेच दोन्ही डोसचे 70% लसीकरण झाले आहे असे जिल्ह्यांकरिता निर्बंधांमध्ये अतिरिक्त शिथिलता देण्यात आलेली आहे. ही यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद अधिकृत माहितीनुसार लसीकरणाची टक्केवारी विचारात घेऊन दर आठवड्याला अद्ययावत केली जाणार असून त्यानुसार जिल्ह्याची यादी अद्यावत करण्यात येणार आहे. तथापि सदर परिशिष्ट मध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश नाही. जिल्हाधिकारी व जिल्हाकदंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा यांनी 01 फेब्रुवारी, 2022 चे मध्यरात्रीपासून नवीन नियमावली लागू केली आहे.
मनोरंजनाची स्थळे जसे की उद्याने, बाग-बगीचे/पार्कस्, किल्ले, प्रेक्षणीय/पर्यटन, प्रेक्षणीय स्थळे स्थळे इत्यादी नियमित वेळेनुसार ऑनलाइन तिकिटासह खुली राहतील. सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. कोविड 19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर या क्रियाकलापांच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी कोणत्याही वेळी अशा क्रियाकलपांना परवानगी देण्याच्या संख्येवर वाजवी निर्बंध लादले पाहिजेत.
जिल्हयातील स्पा ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल, दररोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत सदर दुकाने बंद असतील. कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.
अंत्यविधी करिता कमाल उपस्थितिची मर्यादा काढण्यात येत असून अंत्यविधी करिता यापुढे पुढील आदेशापर्यंत कमाल उपस्थितिची मर्यादा हटविण्यात येत आहे.
वरील सर्व बाबी 8 जानेवारी 2022 च्या राज्य सरकारच्या आदेशाच्या परिशिष्ट 2 च्या अनुषंगाने कोविड योग्य वर्तनाच्या काटेकोर पालनाच्या अधीन असतील. सदर आदेशात नमूद नसलेल्या इतर बाबींकरिता यापूर्वी लागू असलेले तरतुदी अंमलात असतील.सदरीलआदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनीसाथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल वनियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मिणा यांनी कळविले आहे.