गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, आज ९ बाधितांची नोंद, सक्रिय रुग्ण आता ४१

299

– आज ४ कोरोनामुक्त
The गडविश्व
गडचिरोली १३ जुलै : आज गडचिरोली जिल्हयात 413 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 09 असून कोरोनामुक्ताची संख्या 04 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37609 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36793 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 41 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, आरमोरी तालुक्यातील 02, एटापल्ली तालुक्यातील 02, व कोरची तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये आरमोरी तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 01 व कोरची तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here