गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याबाबत अर्ज आमंत्रित

923

– ३४३ ग्रा.पं व ३ नगर पंचायत स्तरावर रिक्त जागा
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील २४३ ग्राम पंचायतस्तावर व ३ नगर पंचायतस्तावर रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याकरिता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी, २०१८ राज्यातील ग्रामिण व शहरी भागात नागरिकांपर्यत शासकीय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तावर व नगर परिषद, नगर पंचायतस्तावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे गडचिरोली जिल्हयातील रिक्त असलेल्या ३४३ ग्राम पंचायतस्तावर व ३ नगर पंचायतस्तावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय ९ जानेवारी,२०१८ च्या परिच्छेद १ (अ) व (आ) मधिल निकषानुसार ग्राम पंचायतस्तरावर ३५१ व नगर पंचायतस्तावर ३ आपले सरकार केंद्र स्थापन करावयाचे आहे.
गडचिरोली जिल्हयात रिक्त असलेल्या ३४३ ग्राम पंचायत व ३ नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना,जिल्हयाच्या www.gadchiroli.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.तसेच रिक्त असलेल्या ग्राम पंचायत व नगर पंचायतस्तरची यादी व नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली असून,अर्जदारांनी २५ जुलै २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथिल सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे असे गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

यादी – 2022062764

https://gadchiroli.gov.in/notice_category/announcements/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here