गडचिरोली जिल्ह्यातील ‘या’ २१ ग्रामपंचायतीकरीता होणार निवडणूक

931

– ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, ८ सप्टेंबर : जानेवारी २०२१ – मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीकरिता सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम- २०२२ सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०२०/ प्र.क्र.०४/का-०८, ०७ सप्टेंबर २०२२ नुसार तयार करण्यात आला आहे.
यात गडचिरोली जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीकरिता सदस्य पदांसह थेट सरपंच पदाकरिता निवडणूक होणार आहे.

२१ ते २७ सप्टेंबर २०२२ (२४ सप्टेंबर २०२२ चा शनिवार व २५ सप्टेंबर २०२२ चा रविवार वगळून), सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयात नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्यात येणार आहे.
नामनिर्देशनपत्र छाननी (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) बुधवार २८ सप्टेंबर २०२२ स. ११.०० वा. छाननी संपेपर्यंत, ३० सप्टेंबर २०२२ दुपारी ३.०० वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहे.
तर ३० सप्टेंबर दुपारी ३.०० वाजता नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल, गुरुवार १३ ऑक्टोबर ला सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० वाजता पर्यंत मतदान, शुक्रवार १४ ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्याठिकाणी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे.
या निवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

‘या’ २१ ग्रामपंचायतीकरीता निवडणूक

गडचिरोली तालुका : पारडी कुपी
चामोर्शी तालुका : घोट, दुर्गापूर
अहेरी तालुका : आरेंदा, खांदला
धानोरा तालुका : मुंज्यालगोंदी, ईरूपटोला, मुरगाव, जप्पी, कामतळा, लेखा
भामरागड तालुका : मन्नेराजाराम, येचली, लाहेरी, मिरगुळवंचा
देसाईगंज तालुका : सावंगी, गांधीनगर
आरमोरी तालुका : जांभळी, नरचुली
एटापल्ली तालुका : कोहका, कोटमी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here