गडचिरोली जिल्हा रोजगार उपलब्ध करून देण्याच्या यादीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

459

– 78237 मजूरांना मिळतोय रोजगार, मनरेगातून 333 ग्रामपंचायतीत 1283 कामे आहेत सुरू
The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात रोजगार हामी योजनेतून जिल्हयातील 457 पैकी 333 गावात विविध कामे सुरू आहेत. याठिकाणी 78237 मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याच्या यादीत गडचिरोली राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना काळात अनेक ठिकाणी मजूरांना रोजगारासाठी फिरावे लागले. स्थलांतरावरती बंधने आल्यानंतर जिल्हयातच मनरेगातून मोठया प्रमाणात कामे हाती घेण्यात आली. गडचिरोली जिल्हयातील कित्येक मजूर सीमालगत असलेल्या इतर राज्यात मोल मजूरीसाठी जातात. मात्र आता नरेगातून मोठ्या प्रमाणात कामे होत असल्याने आपल्या गावातच किंवा जवळ रोजगार उपलब्ध होत असल्याने मजूर मनरेगाला पसंती देत आहेत.
गडचिरोली जिल्हयातील 12 तालुक्यात 1283 एवढी कामे सुरू आहेत. राज्य शासनाच्या सूचनांनुसार प्रत्येक मजूराला किमान 265 दिवसाचे काम मनरेगातून मिळवून देण्यासाठी नियोजन केले जाते. उर्वरीत ग्रामपंचायतीसह सुरू गावातही अनेक कामांची सुरूवात केली जाणार आहे. त्यामूळे मजूरांचा हा आकडा अजून वाढणार असल्याचे संबंधित विभागाकडून कळविण्यात आले आहे. सद्या जिल्हयात मजगी, घरकूल बांधकामे, गुरांचे गोठे, पांदन रस्ते, बोडी, सिंचन विहीर, सिमेंट बंधारे, फळबाग लागवडीसह इतर कामे सुरू आहेत.

प्रशासनाकडून शहराकडे व इतर जिल्हयात राज्यात होणारे स्थलांतर कमी करून जिल्हयातच मजूरांना रोजगार मिळवून देण्यात येत आहे. जिल्हयातील धानोरा तालुक्यात सर्वात जास्त मजूर संख्या असून दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तालुक्याचा आहे.

तालुकानिहाय कामे व मजूर संख्या
धानोरा – 167 कामे, 13821 मजूर
गडचिरोली – 103 कामे, 13528 मजूर
चामोर्शी – 149 कामे, 11359 मजूर
आरमोरी – 194 कामे, 11184 मजूर
कुरखेडा – 133 कामे, 9235 मजूर
कोरची – 77 कामे, 6303 मजूर
देसाईगंज- 81 कामे, 4995 मजूर
मुलचेरा – 81 कामे, 3636 मजूर
एटापल्ली – 84 कामे, 1703 मजूर
अहेरी – 86 कामे, 995 मजूर
भामरागड – 38 कामे, 869 मजूर
सिरोंचा – 90 कामे, 609 मजूर

“गडचिरोली जिल्हयात मनरेगातून कामे घेण्यास मोठा वाव आहे. प्रत्येकाला काम मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करत आहे. मागेल त्याला मनरेगातून रोजगार मिळवून देण्यात येत आहे. मजूरांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून कामे मिळवावीत. ”
माणिक चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here