– ३० मार्च रोजी शहरातील गोंडवाना कलादालनात कार्यशाळा
The गडविश्व
गडचिरोली : नवोदित, शिकाऊ तसेच ज्यांना छायाचित्रकार होण्याची आवड आहे अशांना भविष्यात छायाचित्रकाराच्या माध्यामतून रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने छायाचित्रकार बहुउद्देशिय संस्था, चंद्रपूर व्दारा संलग्नीत गडचिरोली जिल्हा छायाचित्रकार संघटनेच्या वतीने गडचिरोली येथे एकदिवसीय फोटाग्राफी कार्यशाळेचे आयोजन शहरातील गोंडवाना कलादालन पोटगाव रोड येथे ३० मार्च रोजी ११ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे.
सध्याचे युग डिजीटल असल्याने अनेक युवक- युवती सोशल मिडीयाचा वापर करतात. ते स्वत: कॅमेरा घेवून फोटो काढतात परंतु फोटो काढण्याच्या विशिष्ट ज्ञानाच्या अभावी फोटो काढण्याकरिता विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तर काही नवोदित, शिकाऊ हे आपला व्यवसाय म्हणून फोटोग्राफी करीत आहेत पंरतु काहींना फोटाग्राफीच्या योग्य त्या ज्ञाना अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून गडचिरोली जिल्हा छायाचित्रकार संघटनेने एकदिवसीय फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत बेसीक फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीचे आवश्यक ज्ञान देण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेत चंद्रपूरचे सिनेमॉटोग्राफर अमोल मेश्राम हे प्रशिक्षण देणार आहे. सदर प्रशिक्षणारिता ५०० रूपये फि आकरण्यात येणार असून यात दुपारचे जेवणही देण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेत अधिकाअधिकांनी सहभाग दर्शवावा व बेसीक फोटाग्राफी व व्हिडीओग्राफी विषयी ज्ञान घ्यावे असे आवाहन आयोजनकांकडून करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेत सहभागी होण्याकरिता बोढाले स्टुडिओ 9552169316, क्लासिक स्टुडिओ 940412811, नोवेल स्टुडिओ 9421601661, चेतन फोटोग्राफी 8888106414, मदन नैताम 9657402056 या क्रमांकावर नोदणी करावी. तसेच या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व छायाचिकारांसाठी मोफत छायाचित्र स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे यात व्हेडिंग फोटोग्राफी हो विषय असून स्पर्धकाने स्वतः फोटो प्रिंट करून पाठविणे आहे.