गडचिरोली जिल्हयात पुन्हा मुसळधार : बेडगाव सर्कलमध्ये सर्वाधिक १६५.२ मीमी पाऊस, ‘हे’ मार्ग बंद

2032
File Photo

– पुन्हा पुरजन्य परिस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : जिल्हयाला पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहेत. तर जिल्हयातीन अनेक मार्ग पुरामुळे बंद झाले आहे. या सोबतच मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून आज १५ ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार जिल्हयात ७५.६ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर बेडगाव सर्कलमध्ये सर्वाधिक १६५. २ मीमी पावसाची नोंद करण्यात आली असून १ जून पासून आतापर्यंत जिल्हयात १३८१.८ मीमी पावसाची नोंद करण्यात आली असून
मुसळधार पावसाने जिल्हयातील अनेक ठिकाणी पुर पहावयास मिळत आहे. तर जिल्हयातील इतरही मार्ग पुरामुळे बंद झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील पावसाच्या पाण्यामुळे बंद असलेले मार्ग
१५ ऑगस्ट २०२२. वेळ स. १०.०० वा

आरमोरी – गडचिरोली, गडचिरोली – चामोर्शी, कोरची भिमपूर बोडेकसा ( लोकल नाला), कोरची मसेली देवरी बोरी बेदकाठी (लोकल नाला), कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी), वैरागड पतनवाडा रस्ता (लोकल नाला), लाहेरी ते बिनागुंडा (गुंडेनुर नाला), अहेरी बेजुरपल्ली परसेवाडा लंकाचेन रस्ता (लंकाचेन नाला ), अहेरी मोयाबीनपेठा वटरा रस्ता (वटरा नाला), अहेरी गडअहेरी देवलमारी रस्ता (गडअहेरी नाला), आलापल्ली ताडगाव भामरागड रस्ता (पर्लकोटा नदी, कुमरगुडा नाला), सिरोंचा कालेश्वरम वारंगल हैद्राबाद रस्ता (गोदावरी नदीवरील मोठा पूल)

मुसळधार पावसाने नदीच्या तसेच धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुका नुसार पावसाची नोंद मीमी मध्ये

गडचिरोली-५३.०, कुरखेडा-१२२-१, आरमोरी-६९-७, चामोर्शी -६२.०, सिरोंचा २६.५, अहेरी ९२.५, एटापल्ली १०३.२, धानोरा ५५.६, कोरची १६१.३, देसाईगंज ७५.१, मुलचेरा ७५.१, भामरागड –

सर्कलनुसार पावसाची नोंद मीमी मध्ये

बेडगाव सर्वाधिक १६५.२, कढोली-९०.६, आरमोरी- ७२.०, वैरागड- ७४-४, पिसेवडधा- ६८.०, येणापूर-७४.४, आष्टी-९७. ४, अहेरी- ७०.०, आलापल्ली-१००.६, जिमलगट्टा-७२.४, जारावंडी- ८७.२, कसनसूर- ९८.६, गट्टा- १०८. २, पेंढरी-६८.४ , शंकरपूर- ८८.०, मुलचेरा-८६.६

सर्कलनुसार सर्वाधिक पावसाची नोंद

बेडगाव १६५.२, कुरखेडा- १५०.४, पुराडा- १२५.४, पेरमिली- १२७.०, एटापल्ली-११८.८, कोरची- १६०.०, कोटगुल- १५८.६,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here