गडचिरोली जिल्हयात पुन्हा रानटी हत्तींचा धुमाकुळ

169

– आरमोरी तालुक्यातील दवंडी येथील शेतशिवारात माजवला हैदौस

The गडविश्व
गडचिरोली : ओडीसा राज्यातून गडचिरोली जिल्हयात मागील काही महिण्यांअगोदर हत्तीचा कळप दाखल झाला होता. मध्यंतरी शांत असलेल्या हत्तींनी पुन्हा धुमाकुळ माजवल्याचे दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील मोहली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या दवंडी येथील शेतशिवारात गुरूवारी मध्यरात्री रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकुळ माजवत शेतपिकासह झोपडीचे नुकसान केल्याचे कळते.
दवंडी येथील शेतकरी तथा माजी पं.स.सभापती बग्गूजी ताडाम यांच्या शेतशिवारात बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास १२ ते १३ हत्ती असलेल्या हत्तीच्या कळपाने प्रवेश करित शेतात धुमाकुळ माजवला. यात शेतातील मिरची व अन्य पिकांसह शेतातील पक्के बांधलेल्या झोपडीवजा घराचे नुकसान झाले. यांत शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या परिसरात हत्तीच्या धुमाकुळाने भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here