गडचिरोली जिल्हयात पावसाची जोरदार बॅटींग : बोरी-आलापल्ली मार्गावरील रस्ता खचला

719
File Photo

– वाहतुक बंद, आलापल्ली सर्कल मध्ये सर्वाधिक ३२५.८ मीमी तर एटापल्ली सर्कल मध्ये २७६ मीमी पाऊस

The गडविश्व
गडचिरोली, १२ जुलै : जिल्हयात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत आहे. जिल्ह्यातल्या दक्षिण भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पुर आला आहे. अनेक गावांचा जिल्हयाशी संपर्क तुटलेला आहे. अनेक मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद आहेत.
दरम्यान बोरी-आलापल्ली मार्गावरील मुक्तापूर येथील रस्ता खचल्याने वाहतूक बंद असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. तर आज सकाळच्या सुमारास अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील काही घरात पाणी शिरल्याची हि माहीती प्राप्त झाली आहे. २० ते २५ लोकांना स्थानिक युवकांच्या सहाय्याने सुरक्षितरित्या बाहेर काढून त्या त्या भागातील इतर नागरिकांच्या घरी स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थानिक महसूल, पोलीस व एसडीआरएफ पथक पोहचण्याकरिता दोन नाले पार करून जाणे गरजेचे आहे त्याकरिता उपविभागीय पोलीस अधीकारी अहेरी व तहसिलदार अहेरी यांच्यासह पथक सुचना मिळाल्यापासून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करीत असल्याची माहीत आहे.
हवामान विभागाने १० ते १२ जुलै दरम्यान गडचिरोली जिल्हयाला रेड अलर्ट जारी केला होत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान सोमवार ११ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतितातडीचा गडचिरोली दौरा करून जिल्हा आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार असे जाहीर केले. तसेच जिल्यातील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला मेडीकल कॉलेज सुरू करणाार असे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे येतांना आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर प्रत्यक्ष पूर पाहणी केली. व त्यानंतर नैसर्गीक आपत्तीत जीवीत हानी होणार नाही यासाठी यंत्रणांनी समन्वयातून तातडीने मदत व बचावकार्य हाती ध्यावे तसेच पूर बाधीतांचा सर्वे करून तातडीने मदत करावी, पंचनामे सुरू करावे, जिल्हा प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे असे निर्देश दिले आहे

मुसळधार पावसाने चांदाळा ते कुंभी आणि रानमूल ते माडेमूल मार्ग बंद तसेच गोमणी नाल्याच्या पुलावर पाणी असल्यामुळे वाहतुक बंद आहे.

जिल्हयात १ जून पासून अतापर्यंत ५५१.६ मीमी पावसाची नोद झाली असून पुढील प्रमाणे पावसाची नोंद

तालुक्यानुसार पावसाची नोंद

गडचिरोली : ७२.२ मीमी
कुरखेडा : ३४.५ मीमी
आरमोरी : ४६.१ मीमी
चामोर्शी : ४५.६ मीमी
सिरोंचा : १०.१ मीमी
अहेरी : २०९.४ मीमी
एटापल्ली : ६४.६ मीमी
धानोरा : ५२.४ मीमी
कोरची : २३.१ मीमी
देसाईगंज : १५.० मीमी
मुलचेरा : ५७.० मीमी
भामरागड : –

सर्कल नुसार पावसाची नोंद
गडचिरेाली ८७.५ मीमी, बाम्हणी ८८.२ मीमी, वैरागड ७५.२ मीमी, पेरमिली ११५.० मीमी, एटापल्ली ९८.८ मीमी, कसनासून ९२.६ मीमी, पेंढरी ७०.४,

अती मुसळधार पाऊस
असरअल्ली ११६.६ मीमी, जीमलगट्टा १२.६ मीमी

सर्वाधिक पावसाची नोंद
अहेरी २७६.० मीमी, एटापल्ली ३२५.८ मीमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here