गडचिरोली : जंगली डुकराने दुचाकीस्वारास दिली धडक, इसम गंभीर जखमी

931

The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना. अशातच रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारास जंगली डुकाराने धडक दिल्याने इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज १४ नोव्हेंबर रोजी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा इराई ते काशीपुर मार्गावर सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान घडली . धनराज विलास खोबे (२७) रा.गणपुर ता. चामोर्शी जि.गडचिरोली असे जखमी इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धनराज खोबे हे गडचिरोली येथून स्वागावी गणपूर येथे सायंकाळच्या सुमारास दुचाकीने जात होते. दरम्यान कुनघाडा इराई व काशीपुरच्या मार्गावरील रस्त्याच्या मधोमध त्यांच्या दुचाकीला जंगली डुकराने धडक दिली असता खोबे यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झिलबुली झाडाला आदळली. यात खोबे हे गंभीर जखमी झाले. आत त्यांना गुप्त मार बसल्याचे कळते. दसरम्यान तात्काळ त्यांना दादाराव चव्हाण यांच्या चारचाकी वाहनाने गडचिरोली येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्याचीही माहितीही आहे. तर खोबे यांना गुप्त मार असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here