The गडविश्व
गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार किशोर भांडारकर, बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. मुंदडा, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, विवेक दुधबळे, व्ही.बी.चहांदे, आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.