गडचिरोली : चुकीच्या बांधकामामुळे नालीचे पाणी रस्त्यावर

694

– नालीला आले धबधब्याचे स्वरूप, नाली बांधकामात अनियमितता, नालीला चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न

The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील सर्वोदय वार्ड क्रमांक ३ आरमोरी मार्गावरील संताजी भवनाच्या मागील भागातून ते रोहीदास मंदीराकडे निघणााऱ्या मार्गाकडे नाली बांधकाम करण्यात आले. मात्र या नालीचा उतार आंबोरकर यांच्या घरामागील शेजारी काढण्यात आल्याने नाली तुडुंब भरून रस्त्यावर वाहत आहे. याचा मनस्ताप परिसरातील नागरिकाना सहन करावा लागत आहे. चुकीच्या बांधकामामुळे नालीचे पाणी रस्त्यावर वाहू लागले असून नालीला धबधबब्याचा रूप आले होते.
शहरात मागील ७-८  दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी सदर नाली पाण्याने तुडुंब भरून वाहत होती. मात्र सदर नालीचे बांधकाम हे चुकीच्या पध्दतीने करण्यात आले असून सदर नालीला चुकीच्या दिशेन वळवण्याचा सुध्दा प्रयत्न केला जात आहे. सदर नाली बांधकाम हे संताजी सभागृहाच्या मागील परिसरातून हे आंबोरकर यांच्या घरामागच्या परीसरातून करण्यात आले आहे. तसेच नालीचा उतार आंबोरकर यांच्या घराशेजारील भागातील नाली कडे वळवण्याच्या बेताने सदर नाली बांधकाम करण्यात आले. परंतु या परिसारातील नागरिकांनी सदर नालीचे पाणी या भागात न वळवता दुसऱ्या मार्गाने वळवण्यास सांगितले होते. मात्र तसे न करता आंबोरकर यांच्या घरामागील परिसरात उतार दिल्याने नाली तुडुंब वाहून रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे. या रस्त्यानेे कधी काळी नागरिक अवागमन करतात. नगर परिषदेला याबाबत आधीच माहीती देण्यात आली होती तेव्हा नगर परिषदेच्या वतीने यात बदल करून नाली दुसरीकडे वळविण्याचे आश्वासन दिले मात्र तसे झाले नाही. सदर नालीतून रस्त्यावर पाणी वाहू लागल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सदर नालीबांधकामात दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here