गडचिरोली : कुमार चिंता व यतिश देशमुख जिल्ह्याचे नवे अपर पोलीस अधीक्षक

1409

– निलोत्पल नवे पोलीस अधीक्षक
The गडविश्व
गडचिरोली, ९ नोव्हेंबर : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत गृह विभागाने २० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जाहीर केला. यात गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यासह इतरही जिल्हयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत आदेश काढण्यात आले आहे. यावेळी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून निलोत्पल यांची नियुक्ती करण्यात आली. पर पोलीस अधिक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे स्थानांतरण झाल्याने त्यांची जागा रिक्त होती. पंधरा दिवसानंतर ७ नोव्हेंबर रोजी गृह विभागाने शासन आदेश जारी करत जळगांव येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंता व हिंगोली येथील उप विभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख यांची गडचिरोली जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती ने पदस्थापना करीत नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा आता नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक तारे, नव्याने नियुक्ती करण्यात आलेले अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यतिश देशमुख हे कार्यभार सांभाळणार आहे.
तर गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची पुणे (ग्रा) येथील पोलीस अधीक्षक पदी, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख यांची सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी तर अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली पदस्थापणा करण्यात आली आहे. तर आता गडचिरोली चे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बृहन्मुंबई चे पोलीस उप आयुक्त निलोत्पल हे असणार आहेत.

#gadchiroli #spnilotpal #aparpolisadhikshak #kumarchinta #yatishdeshmukh#gadchirolinews #ankitgoyal #samirshekh #anujtare #somaymundhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here