गडचिरोली : आत्मसमर्पित नक्षल्याची गळफास घेऊन आत्महत्या

790

– दोन वर्षांपूर्वी पती-पत्नीने केले होते आत्मसमर्पण

The गडविश्व
गडचिरोली : पोलिसांसमोर दोन वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षली ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवार ८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. नकुल मट्टामी (३५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक नकुल व त्याची पत्नी दोघेही नक्षल दलममध्ये कार्यरत होते. २०१९ मध्ये दोघांनीही गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दरम्यान काल मंगळवारी    नकुल मट्टामी ने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. मृतक नकुल तीन मुले व पत्नी असा परिवार आहे. कौटुंबीक कारणातून नकुल ने आत्महत्या केल्याचे कळते. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here