गडचिरोली : अस्वल शिकार प्रकरणी चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

562

– आरोपीकडून २० नखे जप्त
The गडविश्व
गडचिरोली, ३१ ऑक्टोबर : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील वनपरिक्षेत्रात अस्वलाची शिकार करून अवयव गायब केल्याप्रकरणी चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाला यश आले आहे.
मधुकर मलय्या दुर्गम रा. पेंटीपाका, महेंद्र चंद्रय्या कुम्मरी, राजबापु पेदासमय्या दुर्ग व समय्या मलय्या दुर्गम सर्व रा. लक्ष्मीपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून अस्वलाची २० नखे जप्त करण्यात आली आहे.
२७ ऑक्टोबर ला सिरोंचा वनपरिक्षेत्रातील आरडा नियत क्षेत्रात अस्वलाची शिकार करून अवयव गायब करण्यात आले होते. याप्रकरणी संशयित आरोपींचा शोध वनविभागाच्या पथकाद्वारे घेण्यात येत होता. दरम्यान या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात यश आले असून आरोपींनी रानटी डुकराची शिकार करण्याकरिता पेंटिपाका-पाटीपोचम्मा जंगल परिसरातील मार्गालगत विद्युत तारा सोडण्यात आल्या होत्या मात्र जाळ्यात रानटी डुकरा ऐवजी अस्वल फसले, विद्युत करंट लागल्याने अस्वलाचा मृत्यू झाला व आरोपींनी अस्वलाचे चारही पंजे व गुप्तांग कापून नेले व जंगल परिसरातील एका झाडाखाली नखे लपवून ठेवल्याची कबुली दिली. आरोपींच्या माहितीवरून वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता २० नखे तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेले २ बंडल वायर, बायडिंग वायर जप्त केले. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

#gadchiroli news #gadchiroli #sironcha #forest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here