गडचिरोली : अभियंत्याने कार्यालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

1706

– आत्महत्येचे कारण अस्पष्ट
The गडविश्व
गडचिरोली, ८ नोव्हेंबर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात कार्यरत असलेल्या सहायक अभियंत्याने कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. केशव गजानन आखाडे (२७) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. सदर घटनेने बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
गडचिरोली येथील बांधकाम विभागांतर्गत विद्युत विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात केशव आखाडे हा सहायक वीज अभियंता म्हणून कार्यरत होता तर तो वाशिम जिल्ह्यातील सिल्लोड येथील मूळ रहिवासी असून चार-पाच महिन्यांपूर्वीच गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात सहायक अभियंता पदावर रुजू झाला होता, अशी माहिती आहे. आज अचानक दुपारच्या सुमारास कार्यालयात कुणीच नसताना त्याने छताला गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळ गाठून मर्ग दाखल करीत पंचनामा केला. आत्महत्येचे करण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here