– आदिवासी विद्यार्थांना प्रेरणादायी
The गडविश्व
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील जिमलगट्टा येथील सुरेश मडावी यांनी राष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून जिल्ह्याचे व राज्याचे नावलौकीक केले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांचेकडून प्रेरणा घ्यावी व विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेत यशस्वी व्हावे. जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमाच्या 21 भागात त्यांनी आदिवासी समाजास संबोधन केले.
जिमलगट्टा सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात पहिली ते बारावीचे शिक्षण पूर्ण करुन घरची परिस्थिती बेताची असून आईवडील शेतमजूर आहेत. तरी सुध्दा त्यांनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. याआधी त्यांनी राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत सहभागी होऊन भालाफेक या वैयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांची जिद्द व काटक शरीरयष्टी त्याबरोबरच क्रीडा व आदिवासी संस्कृतीचे मेळ घालून पुढील वाटचाल करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यांना राहुल मेश्राम यांनी प्रशिक्षित केले. राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल दोन महिने अगोदरपासून स्पर्धेचे उद्दिष्टसमोर ठेवून व्हिडिओ क्लिपच्या सहाय्याने त्यांनी सराव केला.
राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धेत महाराष्ष्ट्राचे नेतृत्व करुन सुवर्णपदक पटकाविले. या गावातील संदीप सलामे यांनी सुध्दा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या स्पर्धेत कास्यपदक पटकाविले.
मडावी व सलामे यांनी सकारात्मक विचार व परिस्थितीवर मात करुन नेत्रदिपक कामगिरी केल्याबद्दल आदिवासी समाज व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदतच होणार आहे.
या कार्यक्रमाच्या शेवटी उपायुक्त डी.एस. कुळमेथे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम ATC Nagpur-Nav Chetana या यु-टयुब चॅनेलवरही उपलब्ध आहे. आदिवासी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.