गडचिरोलीसह विदर्भात आकाशातून अग्निवर्षा : अनेकांना कुतूहल व चर्चेला उधाण

3851

– अनेकांनी लावले वेगवेगळे तर्क वितर्क, चर्चेला आले उधाण
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यासह विदर्भात आज रात्रो ८ वाजताच्या सुमारास अचानक आकाशातून अग्निवर्षा होतांना नागरिकांना दिसली. काही नागरिक आपल्या टेरेसवर असतांना तर काहींना बाहेर फिरतांना अचानक अग्निवर्षा दिसल्याने चर्चेला उधाण आले होते तर काहींनी अनेक तर्क वितर्क लावले. तर अनेकांनी कुतुहलही व्यक्त केले. मात्र हा उल्कावात होता की दुसरे काही याबाबत मात्र चर्चा होती. सोशल मीडियावर सुद्धा आकाशातून अग्निवर्षा होतानाचे फोटो, विडिओ तसेच अनेकांच्या व्हाट्सएपच्या स्टेट्सवर सुद्धा फोटो विडिओ पहावयास मिळाले. अनेकांनी वेवगेवगळे तर्क वितर्क लावले. भूगर्भ शत्रज्ञांनी मात्र हा उल्कावर्षावच असल्याच्या अंदाजाला दुजोरा दिल्याचे कळते. याबाबतचे वृत्त लोकमत ने प्रकाशित केले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात हा अग्निवर्षाव पहावयास मिळाला, जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील चोप गावातील अनेकांनी हे दृश्य बघितले, अनेकांच्या मोबाईल व्हाट्सएपवर स्टेटस पहावयास मिळाल्याचे आमच्या प्रतिनिधींनी संगीतले यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते.
तर जिल्हा मुख्यालयातील अनेक भागात सुद्धा नागरिकांनी हे दृश्य बघितले, त्याचप्रमाणे विदर्भातील अनेक जिल्ह्यात हे दृश्य बघावयास मिळाले तर अनेकांनी अनेक तर्क वितर्क लावत चर्चेला उधाण आले होते.

विकिपीडियानुसार

उल्का (इंग्रजी : meteoroid) अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी ओळखले जाते. कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात. पडलेल्यांचा आकार लहानमोठा असू शकतो.

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here