गडचिरोलीत जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुक्यात कोविड मदत कक्षाची स्थापना

150

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता संपुर्ण जिल्हयात कोविड संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना कार्यान्वीत करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मदतीकरीता व प्रशासनाच्या सनियंत्रणाकरीता प्रत्येक तालुक्यात व संपुर्ण जिल्हयासाठी असे मिळून एकुण 14 विविध कोविड नियंत्रण मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

तालुका स्तरीय नियंत्रण कक्ष व त्यांचे संपर्क क्रमांक

अहेरी – 07133-295001

भामरागड – 07138-254028, 9421008827, 9421008807

चामोर्शी – 07135-295240

धानोरा- 8275600746/8275114890

एटापल्ली- 9404933065, 7588442412

कोरची – 8275932599

सिरोंचा – 07131-233129

गडचिरोली- 07132- 233019, 9209155955, 9673198415

आरमोरी – 07137-266508, 9209151047

वडसा- 07137- 272400/9404128880

मुलचेरा – 8275879981, 07135-271033

कुरखेडा – 07139-245199

जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष

07132-222030/222031/9423911077

मदत केंद्र सामान्य रूग्णालय, गडचिरोली

07132-222340/222191

या संपर्क क्रमाकांवर सकारात्मक रूग्णांचा पाठपुरावा करणे, रूग्णांना गृहविलगीकरणामधील आवश्यक मदत पुरविणे, भरती रूग्णांबाबत नातेवाईकांना माहिती देणे तसेच रूग्णासाठी बेडची उपलब्धता अशा सुविधा तालुका निहाय त्या त्या कोविड नियंत्रण कक्षाद्वारे दिल्या जाणार आहेत. तर जिल्हा कोविड नियंत्रण कक्षामधून नागरिकांना नमुना पॉझिटीव आल्यास कळविणे, तक्रार निवारण, बेडची उपलब्धता तसेच रूग्णांबाबतची माहिती दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here