गडचिरोलीत आम आदमी पार्टीची निवडणूक संदर्भात बैठक संपन्न

279

The गडविश्व
गडचिरोली : आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीची निवडणूक संदर्भात बैठक संपन्न झाली. सदर बैठक कॅम्प एरिया मधील जिल्हा कार्यालयातील घेण्यात आली होती. यात एक ठराव घेण्यात आला व सर्वानूमते आगामि नगरपरिषद निवडणूका घेण्याचे ठरवून विदर्भ कमेटिला ठराव पाठवीण्यात आला तसेच निवडणूक संदर्भात कार्यकारीणीत काही बदल करण्यात आले. विदर्भ कमेटिच्या सूचनेनुसार शहर प्रमुख पदाचा कार्यभार बदलवून कैलास शर्मा यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. सर्वांच्या सहमतीने कैलास शर्मा नविन शहर प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले कैलास शर्मा हे मनमिळावू स्वभावामुळे या पदाला न्याय देतील अशी आशा व्यक्त करण्यात आली व त्यांचे भरभरुन स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी वार्ड कमिट्या तयार करण्याची जबाबदारी सुध्दा इतर कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली. लवकरात लवकर वार्ड कमिट्या स्थापन करुन तसा अहवाल विदर्भ कमेटिला पाठवण्याचे बैठकीमध्ये सर्वांच्या सहमतीने ठरवीण्यात आले.
बैठकीला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, महामंत्री भास्कर इंगळे, सोनल न्ननावरे, समिता गेडाम, अलका गजबे, कोशाध्यक्ष संजय जिवतोडे, संघटन मंत्री देवेंद्र मूनघाटे, नवनियुक्त शहर प्रमुख कैलास शर्मा, गणेश त्रिमुखे, मिडीया प्रमुख नामदेव पोले, हितेंद्र गेडाम, रुपेश सावसाकडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here