The गडविश्व
गडचिरोली : नुकतेच गडचिरोली वनविभागाच्या उप वनसंरक्षक पदाचा कार्यभार मिलीश दत्त शर्मा यांनी स्विकारला. यावेळी गडचिरोली येथील गिधाड मित्रांकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी वनविभागाने वनाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र गडचिरोली वनविभागातील उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांचे स्थानांतरण झाल्यानंतर पद रिक्त होते. त्याजागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. अखेर महसूल व वनविभागाने परिपत्रक काढून गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षकपदी चंद्रपूर येथील सहायक वनसंरक्षक मिलीश शर्मा यांची नियुक्ती केली. नुकतेच मिलीश शर्मा यांनी गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षकपदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी शहरातील गिधाड मित्रांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी गिधाड संरक्षणाकरिता पाहिजे त्या उपयोजना आपल्या स्तरावर करण्याचा प्रयत्न करणार असे बोलून दाखवले तसेच यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी अजय कुकडकर, दिनकर दुधबळे, राहुल कापकर, नरेंद्र पिपरे, उपस्थित होते.