गंजीरामंना पेठा येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल 

126

The गडविश्व
गडचिरोली, २२ सप्टेंबर : सिरोंचा तालुक्यातील गंजीरामंना पेठा येथील एका घरातून गुळाचा सडवा नष्ट करीत संबंधितावर गुन्हा दाखल केल्याची कारवाई असरअली पोलिसांनी केली आहे.

सिरोंचा तालुक्यातील गंजीरामंना पेठा येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या महिलांकडून प्रयत्न सुरु आहेत. अशातच गावातील एका विक्रेत्याने दारू गाळण्यासाठी गुळाचा सडवा टाकल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस, मुक्तिपथ व गावसंघटनेच्या महिलांनी संयुक्तरित्या दारूविक्रेत्याच्या घरी पाहणी केली असता, 10 ड्रम गुळाचा सडवा आढळून आला. घटनास्थळावरून जवळपास 1 लाख 6 हजारांचा मुद्देमाल नष्ट करीत संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here