खा.अशोक नेते यांनी बोदली येथील वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या परिवाराचे सांत्वन करत केली आर्थिक मदत

306

The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : तालुक्यातील बोदली येथील मारोती निंबाजी पिपरे हे जंगलालगत असलेल्या शेत शिवारात गुरे चारत असतांना तिथेच अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना काल ६ ऑगस्ट रोजी घडली. घटनेची माहिती खा.अशोक नेते यांना होतात त्यांनी पिपरे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करत आर्थिक मदत केली.
याप्रसंगी खा.अशोक नेते, ग्रा.पं.बोदलीचे सरपंच तथा युवा मोर्चा भाजपाचे गडचिरोली तालुका अध्यक्ष आकाश गजानन निकोडे, नितीन कुनघाडकर, मुलगा सदाशिव मारोती पिपरे, पत्नी अनुसया मारोती पिपरे, उपवनसंरक्षक शर्मा, सहायक वनसंरक्षक सोनल भडके तसेच वनअधिकाऱी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here