खा.अशोक नेते यांनी चातगाव येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना १६४ व्या शहिद दिनानिमित्त केले अभिवादन

211

– शहिद दिनानिमित्त गोटुल भुमी चातगांव येथे विनम्र अभिवादन व सांस्कृतिक जतन
The गडविश्व
गडचिरोली, २१ ऑक्टोंबर : देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी निमित्ताने विर शहिद बाबुराव शेडमाके यांच्या १६४ व्या शहिद दिनानिमित्ताने शहिद विरांचे स्मरणार्थ शहिद विरांचे स्मरण गोटुल भुमी चातगांव येथे गोटूल समिती,हिरा सुखा आदिवासी बहुउद्देशीय संस्था चातगांव ता. गडचिरोली च्या वतीने १८५७ चे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा १६४ व्या शहीद दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला उदघाटक म्हणून खासदार अशोक नेते होते.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून खासदार अशोक नेते पुढे बोलतांना म्हणाले कि, वीर बाबुराव शेडमाके हे गडचिरोली क्षेत्राच्या इतिहासात आदिवासींच्या संघर्षाला अजरामर करून गौरव शाली प्रतिकार युद्धाची मांडणी करून गेले आहे व ते आजही वर्तमानातील शोषणा विरोधातील इथल्या संघर्षांना प्रेरणा देत आहे. येन तरुण वयात शोषणा विरोधात त्याने आवाज उचलून, जनतेला संघटीत करून विद्रोह त्यांनी उभा केला. आदिवासी क्षेत्रात होत असलेला परीकीयांचा शिरकाव, इंग्रजांचे वाढते अन्याय यांच्या विरोधात व जल जंगल जमिनीच्या अधिकारासाठी त्यांने विद्रोह पुकारला. केवळ २५ वर्षाच्या त्या शूरवीराने खऱ्या स्वातंत्र्यासाठी शसस्त्र संघर्ष उभा केला असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमादरम्यान पार्वताबाई सिडाम १०४ वर्षीय या महिलेने आदिवासी सांस्कृतिचे जतन व प्रबोधन केल्याने तसेच मिस.इंडियाच्या मनिषा मडावी यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी सिकलसेल कॅम्प, क्षयरोग तपासणी, रक्तदाब, शुगर तपासणी सुध्दा करण्यात आले.
यावेळी खा. अशोक नेते यांच्या हस्ते रॅलीची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी आमदार रामदासजी आंबटकर यांनी मार्गदर्शन करतांना वीर बाबुराव शेडमाके यांनी अल्प आयुष्यात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरोधात लढा दिला.असे प्रतिपादन यावेळी केले. तसेच याप्रसंगी माजी आमदार हिरामण वरखडे, प्रकाश गेडाम, देवाजी तोफा इत्यादींनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी खासदार अशोक नेते, विधानपरिषदचे आमदार डॉ.रामदासजी आंबटकर, माजी.आमदार हिरामण वरखडे, प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश गेडाम, देवाजी तोफा सामाजिक कार्यकर्त, दादाश्री मसराम, गोपाल ऊईके सरपंच, रंजिताताई कोडापे माजी सभापती, सुनिताताई मडावी सामाजिक कार्यकर्त्यां, विजय कुमरे ता.महामंत्री, आशिष पिपरे नगरसेवक चामोर्शी, अनिल पोहनकर, प्रशांत भुगुवार, प्रविण मडावी, दिलिप उसेंडी, सुकरु जुमनाके, दशरथ पुंघाटे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here