खळबळजनक : शेतशिवारात अचानक विज कोसळली, चार महिलांचा मृत्यू

1764

– घटनेने परिसरात हळहळ
The गडविश्व
चंद्रपूर, ३० जुलै : शेतात काम करत असतांना विज कोसळून चार महिलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्हयातील वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथे आज शनिवार ३० जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
हिरावती शालिक झाडे (४५) रा. वायगव भोयर, पार्वता रमेश झाडे (५०) रा. वायगाव, मधुमती सरेश झाडे (२०) रा. वायगाव, रीना नामदेव गजभे (२०) रा. वायगाव भोयर असे मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास वरोरा तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान वायगाव भोयर परिसरात मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान शेतात काम करत असताना एकाएकी हवामानात बदल झाल्याने घराकडे निघताना अचानक शेतशिवारात चार महिलांवर विज कोसळली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यातील मृतक हिरावती शालिक झाडे हया माजी पंचायत समिती सदस्या असल्याचे कळते. विज कोसळून एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू झाल्याने भितीचे वातावर पसरले असून त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत तसेच कृटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशन ला देण्यात आली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतकांच्या कुटुंबाना तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here