खळबळजनक : विषबाधेने बिबट्यासह दोन कोल्हे, तीन रानकुत्रे व एका रानमांजरीचा मृत्यू

416

– मृतक मादी बिबट सात ते आठ वर्षाची, दोन कोल्हे मादी व रानकुत्रे नर
The गडविश्व
भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पिंपळगाव निपाणी गटक्रमांकात विषबाधेने विषबाधेने बिबट्यासह दोन कोल्हे, तीन रानकुत्रे व एका रानमांजरीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, आज सदर घटनास्थळी दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रथम एक बिबट मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्यांना अन्य ठिकाणी काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यावेळी दोन कोल्हे, तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर मृतावस्थेत आढळून आले. तीन किलोमीटरच्या परिसरात ७ वन्यप्राणी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमका प्रकार कसा घडला याचा शोध घेतला. लाखणीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गुणवंत भडके व त्यांच्या चमुला घटनास्थळी बोलावण्यात आले. सर्व प्राण्यांच्या शवविच्छेदनानंतर हा प्रकार विषबाधेतून घडल्याचे निष्पन्न झाले. बिबट हा सात ते आठ वर्षाचा असून ती मादी आहे दोन कोल्हे हे मादीच असून तीन रानकुत्रे नर होते. शवविच्छेदण झाल्यानंतर त्याच परिसरात अग्निदाह संस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here