खळबळजनक : बायकोला साडी नेसता येत नसल्याने नवविवाहित तरुणाने केली आत्महत्या

1309

– व्हॉट्सअपवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् ठेवून केली आत्महत्या
The गडविश्व
औरंगाबाद : आपल्या मनासारखी बायको मिळाली नाही, तसेच तिच्या अनेक सवयी पटत नसल्याने व बायकोला साडी नेसता येत नसल्याने नैराश्येत असलेल्या औरंगाबादमधील नवविवाहित तरुणाने व्हॉट्सअपवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् ठेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे समोर आली आहे. अजय समाधान साबळे (२५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
राजनगर भागात आई-वडिलांनासोबत राहणारा अजय प्लंम्बरच काम करून घर चालवत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. तर काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या मोबाईलवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् ठेवला. त्यामुळे हे स्टेट्स पाहून त्याचा एक मित्र त्याला घरी भेटायला आला. तो त्याच्या खोलीत गेला असता अजयने गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अजयला रुग्णालयात हलवले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयच्या खोलीत एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. यात त्याने लिहिले आहे की, मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवायला नेले तर तिथेही ती जेवणानंतर स्वतःच्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. मात्र या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का, हे तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्या करण्याआधी वेगवेगळी कारणे आपण ऐकत असतो मात्र बायकोला साडी नेसता न येण्यामुळे आत्महत्या केलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here