खळबळजनक : बीएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

652

The गडविश्व
अमृतसर : बीएसएफ जवानामध्ये आपसी वादातून झालेल्या गोळीबारात ४ जवानांचा मृत्यू तर १० जवान गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना अमृतसर येथील खासा गावात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा वादा इतका पेटला की आपल्याच साथीदारांवार गोळबार केला. या गोळीबारामध्ये ४ जवानांचा मृत्यू झाला. तर १० जवान गंभीर जखमी आहेत.
अमृतसरमधील बीएसएफच्या मेसमध्ये वाद झाला हा वाद विकोप्याला गेल्याने एका बीएसएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केला. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. तर जखमी रुग्णांना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळ्या झाडणाऱ्या हवालदाराचे नाव कटप्पा असे आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र गोळीबाराचे अद्याप कारण कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here