क्लिनिकचा ३० जणांनी घेतला लाभ

251

The गडविश्व
गडचिरोली : शहरातील विवेकानंदनगर व पोर्ला येथे मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा एकूण ३० रुग्णांनी लाभ घेतला आहे.
दारूचे व्यसन, हा एक आजार आहे, आणि तो उपचाराने बरा होऊ शकतो. दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना गावातच उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवर क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. गडचिरोली शहरातील विवेकानंदनगरातील क्लिनिकमध्ये १६ तर पोर्ला येथील क्लिनिकमध्ये १४ अशा एकूण ३० रुग्णांनी पूर्ण उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
दोन्ही क्लिनिकमध्ये अरुण भोसले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना दिली. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. विवेकानंदनगरातील क्लिनिकचे नियोजन मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी राकेश रत्नावार यांच्यासह वॉर्डातील नागरिकांनी सहकार्य केले. तसेच पोर्ला येथील क्लिनिकचे नियोजन तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले व सरपंच निवृता राऊत, तंमुस अध्यक्ष भास्कर मेश्राम यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here