कोविड-१९ साथरोगसंदर्भाने जिल्ह्यात लागू असलेली जमावबंदी, संचारबंदी व साथरोग नियमावली रद्द

415

– नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हितकारक

The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी करण्यात येत होती. ३१ मार्च २०२२ च्या शासन आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात कोविड-१९ विषाणू साथरोग परिस्थिती नियंत्रण असल्याने सद्यस्थितीत सुरु असलेले कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमावली शिथील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३२ मार्च २०२२ च्या शासन आदेशातील तरतुदीच्यां अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्यो‍गिक क्षेत्रातील जनतेस, व्यक्ती्, आस्थापना यांना उद्देशुन यापूर्वी लागू असलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भांत सर्व आदेश रद्द करणे आवश्यखक असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा यांनी ३१ मार्च २०२२ च्या शासन निर्देशाप्रमाणे कोविड – १९ साथरोग संदर्भाने वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींसंदर्भात जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी व साथरोग संदर्भाने सर्व आदेश आज १ एप्रिल २०२२ च्या मध्यरात्रीपासून रद्द केले आहे. तथापि नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे आरोग्याचे दृष्टिकोनाने हितकारक असेल असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here