– पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे व ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात महाशिवरात्री निमित्त भरण्यात येणाऱ्या यात्रा कोरोना मुळे मागील दोन वर्षांपासून भरु शकल्या नाहीत, परंतु या वर्षी जिल्ह्यात व संपूर्ण राज्यात कोरोना आटोक्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यात्रेला परवानगी देण्यात आली होती परंतु जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आज २७ फेब्रुवारी २०२२ च्या आदेशानुसार महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या जिल्ह्यातील यात्रेची परवानगी रद्द करण्यात आली असून जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या या आदेशाने जिल्ह्यातील अनेक भाविक भक्तांच्या भावना दुखावल्या आहे. शिवाय जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला असल्याने कोविड नियमांचे पालन करून महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यात भरण्यात येणाऱ्या यात्रेकरीता परवानगी देण्यास काही हरकत नसून या यात्रेकरीता किंवा भाविकांना दर्शनाकरिता तरी परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजयी वडेट्टीवार यांच्या कडे निवेदनातून केली आहे.