‘कॉलरवाली’ अशी ओळख असलेल्या २९ बछड्यांना जन्म देणाऱ्या वाघिणीचा मृत्यू

277

The गडविश्व
नागपूर : टी-१५ तसेच ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व अकरा वर्षांत २९ बछड्यांना जन्म देऊन ‘सुपर मॉम’ ठरलेल्या १७ वर्षीय वाघिणीचा शनिवारी संध्याकाळच्या सुमारास पेंच प्रकल्पातील राखीव वनक्षेत्रात वार्धक्यामुळे मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने वन्यप्रेमी हळहळले आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली, असे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘कॉलरवाली वाघिण’, ‘पेंचची राणी’ ‘सुपर मॉम’ अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीने २००८ ते २०१९ या ११ वर्षांमध्ये २९ बच्छड्यांना जन्म दिला होता. यापैकी २५ बछडे जिवंत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वार्धक्यामुळे अशक्त झालेली ही वाघीण शुक्रवारी, १४ जानेवारीला जंगलात पर्यटकांना शेवटची दिसली.
तज्ज्ञांच्या मते, वाघाचे सरासरी वय सुमारे १२ वर्षे असते. मार्च २००८ मध्ये या मादीला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. त्यानंतर रेडिओ कॉलरने काम करणे बंद केले होते, जानेवारी २०१० मध्ये तिला पुन्हा रेडिओ कॉलर लावले होते. नंतर ही वाघीण ‘कॉलरवालीर’ किंवा टी-१५ या नावाने प्रसिद्ध झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here