The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील कूरूमपली येथे जगदंबा क्रिकेट क्लब यांच्या तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा माजी सभापती भास्कर तलांडे व तिसरा पुरस्कार पेरमिलीचे माजी सरपंच शप्रमोद आत्राम असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कूरूमपलीचे सरपंच मूत्ताजी मडावी होते तर यावेळी मंचावर उपसरपंच कु.मैनी तलांडी, जोगि तलांडी, शैलेश कोंडागूर्ले, मडावी मँडम, कुमरे मँडम, गोंगलू तलांडी, अशोक नामनवार आदि होते.
कार्यक्रमाच्या संचालन व आभार मडावी यांनी मानले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाजीराव तलांडे, नितीन कम्बगोनीवार, रामनाथ तलांडी, विलास टेकाम, सतीश आत्राम, रमेश तलांडे व गावातील नागरिक उपस्थित होते.